काय सुख आहे वाउगें बोलतां । ध्यातां पंढरिनाथा कष्ट नाहीं ॥१॥
सर्वकाळ वाचे उच्चारितां हरि । तया सुखा सरि पाड नाहीं ॥ध्रु.॥
रामकृष्णरंगीं रसना रंगली । अमृताची उकळी नाम तुझें ॥२॥
तुका म्हणे धन्य तयाचें वदन । जया नारायण ध्यानीं मनीं ॥३॥
सर्वकाळ वाचे उच्चारितां हरि । तया सुखा सरि पाड नाहीं ॥ध्रु.॥
रामकृष्णरंगीं रसना रंगली । अमृताची उकळी नाम तुझें ॥२॥
तुका म्हणे धन्य तयाचें वदन । जया नारायण ध्यानीं मनीं ॥३॥
व्यर्थ बोलण्यात काय सुख आहे? पंढरीनाथाचे ध्यान करताना कसलेही कष्ट नाहीत. सतत वाचेने हरिनाम घेण्याच्या सुखाशी कशाचीच बरोबरी होऊ शकत नाही. जिव्हा राम-कृष्ण नामात रंगली की तुझ्या नामाची अमृताची उकळी फुटते. ज्याच्या ध्यानीमनी नारायण आहे, त्याचे मुख धन्य होय, असे तुकाराम महाराज म्हणतात.