नमिला गणपति माऊली सारजा । आतां गुरुराजा दंडवत ।। १ ।।
गुरुरायाचरणीं मस्तक ठेविला । आपुल्या स्तुतीला द्यावी मती ।। २ ।।
गुरुराया तुज ऐसा नाहीं सखा । कृपा करुनी रंका धरीं हातीं ।। ३ ।।
तुका म्हणे माता पिता गुरु बंधु । तूंचि कृपासिंधु पांडुरंगा ।। ४ ।।