कैसी करूं तुझी सेवा । ऐसें सांगावें जी देवा ।
कैसा आणूं अनुभवा । होशी ठावा कैशापरी ॥१॥
कर्मभ्रष्ट माझें मन । नेणें जप तप अनुष्ठान ।
नाहीं इंद्रियांसि दमन । नव्हे मन एकविध ॥ध्रु.॥
नेणे यातीचा आचार । नेणें भक्तीचा विचार ।
मज नाहीं संतांचा आधार । नाहीं स्थिर बुद्धि माझी ॥२॥
न सुटे मायाजाळ । नाहीं वैराग्याचें बळ ।
न जिंकवती सबळ । काम क्रोध शरीरीं ॥३॥
आतां राख कैसें तरि । मज नुपेक्षावें हरी ।
तुझीं ब्रिदें चराचरीं । तैसीं साच करीं तुका म्हणे ॥४॥