निर्गुणाचा संग धरिला जो आवडी । तेणे केले देशधडी आपणासी ॥
अनेकत्व नेले अनेकत्व नेले । एकले सांडले निरंजनी ॥
एकत्र पाहता अवघेचि लटिके । जे पाहे तितुके रुप तुझे ॥
म्हणे गोरा कुंभार ऐका नामदेवा । तुम्हा आम्हा नाव कैचे कोण ॥