युगे अठ्ठावीस विठ्ठल विटेवरी उभा ।
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ॥
पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा ।
चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ॥१॥
जय देव जय देव जय पांडुरंगा ।
आरती ओवाळू रखुमाईच्या वल्लभा ॥धृ.॥
तुळसीमाळा गळा कर ठेवूनि कटीं ।
कासे पितांबर कस्तुरी लल्लाटी ॥
देव मुनी जन ध्याती गरुडपारापाशीं ।
दर्शनमात्रे संकटे पळती भक्तांची ॥२॥
आषाढी कार्तिकी भक्त पूजक येती ।
चंद्रभागेमाजी स्नाने जे करिती ॥
दर्शन हेळामात्रे तया होय मुक्ती ।
केशवचरणी नामे गाइली आरती ॥३॥
भावार्थ: भक्त पुंडलिकासाठी परब्रह्म विठ्ठल २८ युगे विटेवर उभा असून डाव्या बाजूला रुक्मिणी माता शोभत आहे. गळ्यात तुळशीची माळ आणि कंबरेवर हात ठेवून उभा असलेल्या पांडुरंगाच्या केवळ दर्शनाने भक्तांची सर्व संकटे दूर होतात आणि चंद्रभागेच्या स्नाने मुक्ती लाभते.
श्री विठ्ठलाची आरती
१०. युगे अठ्ठावीस विठ्ठल विटेवरी उभा
युगे अठ्ठावीस विठ्ठल विटेवरी उभा ।
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ॥
पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा ।
चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ॥१॥
जय देव जय देव जय पांडुरंगा ।
आरती ओवाळू रखुमाईच्या वल्लभा ॥धृ.॥
तुळसीमाळा गळा कर ठेवूनि कटीं ।
कासे पितांबर कस्तुरी लल्लाटी ॥
देव मुनी जन ध्याती गरुडपारापाशीं ।
दर्शनमात्रे संकटे पळती भक्तांची ॥२॥
आषाढी कार्तिकी भक्त पूजक येती ।
चंद्रभागेमाजी स्नाने जे करिती ॥
दर्शन हेळामात्रे तया होय मुक्ती ।
केशवचरणी नामे गाइली आरती ॥३॥