॥ जय जय विठ्ठल रखुमाई ॥ संतवाणी डिजिटल लायब्ररी २०२६
पवित्र ग्रंथ संपदा

श्रीमत् दासबोध

॥ समर्थ रामदास स्वामी ॥

डिजिटल संकलन वेगाने सुरू आहे!

'श्रीमत् दासबोध' या ग्रंथातील सर्व २० दशक आणि २०० समास अर्थासहित संकलित करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. लवकरच प्रत्येक दशकाचे अध्यायनिहाय वाचन इथे उपलब्ध केले जाईल.

दासबोध ग्रंथाविषयी सविस्तर माहिती

श्रीमत् दासबोध हा राष्ट्रसंत समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेला अत्यंत प्रख्यात ग्रंथ आहे. या ग्रंथाचे लेखन त्यांचे पट्टशिष्य कल्याण स्वामी यांनी केले. रायगड जिल्ह्यातील अत्यंत निबीड अरण्यात विसावलेल्या ऐतिहासिक शिवथरची घळ या ठिकाणी या ग्रंथाचे लेखन झाले.

दासबोध हा ग्रंथ एकूण २० दशकांमध्ये विभागलेला असून, प्रत्येक दशकात १० समास आहेत. एकेका समासात एक एक विषय घेऊन समर्थांनी सांसारिकांच्या, साधकांच्या, निस्पृहांच्या, विरक्तांच्या, सर्वसामान्यांच्या, बालकांच्या, प्रौढांच्या आणि जराजर्जरांच्या अशा सर्व मानवी मनाला अत्यंत व्यावहारिक उपदेश केला आहे.

भक्तांचेनि साभिमानें। कृपा केली दाशरथीनें। समर्थकृपेचीं वचनें। तो हा दासबोध ॥श्रीराम॥
वीस दशक दासबोध। श्रवणद्वारें घेतां शोध। मनकर्त्यास विशद। परमार्थ होतो ॥श्रीराम॥
वीस दशक दोनीसें समास। साधकें पाहावें सावकास। विवरतां विशेषाविशेष। कळों लागे ॥श्रीराम॥
ग्रंथाचें करावें स्तवन। स्तवनाचें काये प्रयोजन। येथें प्रत्ययास कारण। प्रत्ययो पाहावा ॥श्रीराम॥
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

दासबोधातील २० दशक (अध्याय यादी)

दशक १ ला: स्तवनांचा
दशक २ रा: मूर्खलक्षणांचा
दशक ३ रा: सगुणपरीक्षा
दशक ४ था: नवविधाभक्तीचा
दशक ५ वा: मंत्रांचा
दशक ६ वा: देवशोधनाचा
दशक ७ वा: चौदा ब्रह्मांचा
दशक ८ वा: मायोद्भवाचा
दशक ९ वा: गुणरूपाचा
दशक १० वा: जगज्योतीचा
दशक ११ वा: भीमदशक
दशक १२ वा: विवेकवैराग्यनाम
दशक १३ वा: नामरूप
दशक १४ वा: अखंडध्याननाम
दशक १५ वा: आत्मदशक
दशक १६ वा: सप्ततिन्वयाचा
दशक १७ वा: प्रकृतिपुरुषाचा
दशक १८ वा: बहुजिनसी
दशक १९ वा: शिकवणनाम
दशक २० वा: पूर्णदशक
सर्व ग्रंथ संपदा पाहा