टाळघोळ सुख नामाचा गजर ।
घोषें जेजेकार ब्रम्हानंदु ॥१॥
गरुडटके दिंडी पताकांचे भार ।
आनंद अपार ब्रम्हादिकां ॥ध्रु.॥
आनंदें वैष्णव जाती लोटांगणीं ।
एक एकाहुनि भद्रजाति ॥२॥
तेणें सुखें सुटे पाषाणां पाझर ।
नष्ट खळ नर शुद्ध होती ॥३॥
तुका म्हणे सोपें वैकुंठवासी जातां ।
रामकृष्ण कथा हे ची वाट ॥४॥
घोषें जेजेकार ब्रम्हानंदु ॥१॥
गरुडटके दिंडी पताकांचे भार ।
आनंद अपार ब्रम्हादिकां ॥ध्रु.॥
आनंदें वैष्णव जाती लोटांगणीं ।
एक एकाहुनि भद्रजाति ॥२॥
तेणें सुखें सुटे पाषाणां पाझर ।
नष्ट खळ नर शुद्ध होती ॥३॥
तुका म्हणे सोपें वैकुंठवासी जातां ।
रामकृष्ण कथा हे ची वाट ॥४॥