॥ संपूर्ण १५ अध्याय सूची ॥
तुम्हाला ज्या अध्यायाचे वाचन करायचे आहे, त्यावर क्लिक करा.
कवीकुलगुरू श्रीधरस्वामी नाझरेकर विरचित प्रासादिक मराठी शिवभक्ती ग्रंथ आणि संपूर्ण अध्याय अर्थासह.
'श्री शिवलीलामृत' हा कवीकुलगुरू श्रीधरस्वामी नाझरेकर यांनी काशी विश्वेश्वराच्या मंदिरात बसून लिहिलेला अत्यंत लोकप्रिय मराठी काव्यग्रंथ आहे. या ग्रंथाला ३०० हून अधिक वर्षांची महान परंपरा आहे. महाराष्ट्रात आणि देशभरात शिवभक्त या ग्रंथाची भक्तिभावाने पारायणे करतात.
शिवलीलामृतात मुख्य १४ अध्याय असून एकूण २४५० ओव्या आहेत. कोणत्याही सोवळ्या-ओवळ्याचे किंवा कडक नियमांचे बंधन नसणारा, स्त्रियांना व सर्वांना सहजतेने पारायण करता येणारा हा ग्रंथ आहे. विशेषतः यातील ११ वा अध्याय (रुद्राक्ष व भस्म महिमा) अत्यंत लोकप्रिय असून भाविक तो नित्यनेमाने पठण करतात.
शिवकृपा, आपत्ती निवारण, रोगांपासून मुक्ती आणि मनोकामना पूर्तीसाठी श्री शिवलीलामृत ग्रंथाचे वाचन अत्यंत फलदायी मानले जाते.
तुम्हाला ज्या अध्यायाचे वाचन करायचे आहे, त्यावर क्लिक करा.
"कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारम् भुजगेन्द्रहारम् ।
सदावसन्तं हृदयारविन्दे भवं भवानीसहितं नमामि ॥"