॥ जय जय विठ्ठल रखुमाई ॥ संतवाणी डिजिटल लायब्ररी २०२६
आदिकाव्य - पावन महाकाव्य

श्री वाल्मीकि रामायण

॥ मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम चरित्र ॥

डिजिटल संकलन वेगाने सुरू आहे!

रामायणातील सर्व ७ कांडांचे श्लोक, भावार्थ आणि सविस्तर कथा संकलित करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. लवकरच हा संपूर्ण ग्रंथ डिजिटल स्वरूपात अभ्यासासाठी विनामूल्य उपलब्ध केला जाईल.

रामायणाचा संक्षिप्त परिचय

रामायण हे महर्षी वाल्मीकी ऋषींनी अनुष्टुभ छंदात रचलेले एक महान आद्य काव्य असून, हिंदू धर्मात अत्यंत पवित्र ग्रंथ मानले जाते. या महाकाव्यात एकूण २४,००० श्लोक असून ते ७ कांडांमध्ये विभागलेले आहेत. यामध्ये अयोध्येचे राजपुत्र मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम, माता सीता, लक्ष्मण, भरत आणि हनुमान यांचे आदर्श चरित्र वर्णिले आहे.

वाल्मीकींनी रचलेल्या या काव्याचा प्रचार सर्वप्रथम श्रीरामाचे पुत्र लव आणि कुश यांनी केला. या ग्रंथाचा प्रभाव १६व्या शतकातील संत एकनाथ (भावार्थ रामायण), गोस्वामी तुलसीदास (रामचरितमानस), १३व्या शतकातील तमिळ कवी कंब आणि २०व्या शतकातील ग. दि. माडगूळकर (गीतरामायण) यांच्या रचनांवर दिसून येतो.

आदौ रामतपोवनादिगमनं हत्वा मृगं काञ्चनम्। वैदेहीहरणं जटायुमरणं सुग्रीवसम्भाषणम् ॥
वालीनिर्दलनं समुद्रतरणं लङ्कापुरीदाहनम्‌। पश्चात् रावणकुम्भकर्णहननम् एतद्धि रामायणम् ॥
(संपूर्ण रामायणाची कथा सांगणारा एकश्लोकी मंत्र)

रामायणातील ७ कांडे (प्रकरणे)

१. बाल कांड: श्रीराम जन्म, बालपण, विश्वामित्रांसोबत वगमन आणि सीता स्वयंवर.
२. अयोध्या कांड: कैकेयीचा वर, श्रीरामाचा १४ वर्षांचा वनवास आणि राजा दशरथाचा मृत्यू.
३. अरण्य कांड: वनवासातील जीवन, शूर्पणखा प्रसंग, पंचवटी निवास व सीतेचे अपहरण.
४. किष्किंधा कांड: सुग्रीव-हनुमंत भेट, वाली वध आणि वानरसैन्याची सीताशोध मोहीम.
५. सुंदर कांड: हनुमंताचे समुद्र लांघणे, अशोकवनात सीता भेट व लंकादहन.
६. युद्ध कांड: सेतुबंधन, राम-रावण महायुद्ध, रावणवध आणि श्रीरामाचा पट्टाभिषेक.
७. उत्तर कांड: सीता त्याग, लव-कुश जन्म आणि रामावताराची समाप्ती.

नारदमुनींनी सांगितलेले आदर्श मनुष्याचे १६ गुण

वाल्मीकी रामायणातील संक्षेप रामायणात नारदमुनींनी श्रीरामांच्या रूपाने आदर्श माणसाच्या १६ गुणांचे वर्णन केले आहे:

१. गुणवान (नीतिवंत)
२. वीर्यवान (शूर)
३. धर्मज्ञ (धर्माचा जाणकार)
४. कृतज्ञ
५. सत्यवाक्य (सत्यवचनी)
६. दृढवृत्त (आत्मविश्वासी)
७. चारित्र्यवान
८. सर्वभूतहित (दयाळू)
९. विद्वान
१०. समर्थ
११. सदैक प्रियदर्शन
१२. आत्मवंत (धैर्यस्थ)
१३. जितक्रोध (अक्रोध)
१४. द्युतिमान (तेजस्वी)
१५. अनसूयक (असूयारहित)
१६. सर्वदेवपूजित

अध्यात्म व जैन परंपरेतील रामायण

• जैन परंपरेतील 'पंप रामायण' (नागचंद्र रचित):

कन्नड साहित्यातील 'रामचंद्र चरित पुराण' (पंप रामायण) नागचंद्र यांनी ११व्या शतकात रचले. यात जैन परंपरेनुसार कथा मांडली आहे. यात रावणाचा वध श्रीरामांऐवजी लक्ष्मणाने केला असे दाखवले आहे. सीतेने अग्नीपरीक्षे नंतर जिनव्रती होऊन साध्वी जीवन स्वीकारले.

• अध्यात्म रामायण (ब्रह्मांड पुराणाचा भाग):

हे शिव-पार्वती संवादाच्या रूपात मांडलेले ७ कांड व १५ सर्गांचे तत्त्वज्ञानप्रधान काव्य आहे. यात श्रीरामांना परब्रह्म मानले असून, 'रामहृदय' व शबरी भक्तीचा अनोखा उपदेश यात आढळतो.

रामायणाचा जागतिक प्रभाव

भारतीय संस्कृतीचा प्रसार आशिया खंडातील अनेक देशांमध्ये झाला असून तेथील राष्ट्रीय साहित्यात रामायणाला अत्यंत उच्च स्थान आहे:

॥ ऋणमोचक मङ्गलस्तोत्रम् ॥

मङ्गलो भूमिपुत्रश्च ऋणहर्ता धनप्रदः। स्थिरासनो महाकायः सर्वकर्मविरोधकः ॥१॥
लोहितो लोहिताक्षश्च सामगानां कृपाकरः। धरात्मजः कुजो भौमो भूतिदो भूमिनन्दनः ॥२॥
अङ्गारको यमश्चैव सर्वरोगापहारकः। व्रुष्टेः कर्ताऽपहर्ताच सर्वकामफलप्रदः ॥३॥
धरणीगर्भसम्भूतं विद्युत्कान्तिसमप्रभम्। कुमारं शक्तिहस्तंच मङ्गलं प्रणमाम्यहम् ॥५॥
(ऋणमुक्ती व धनप्राप्तीसाठी नित्य पठणीय पावन स्तोत्र)

रामायणावर आधारित गाजलेली पुस्तके व साहित्य

गीतरामायण: ग. दि. माडगूळकर
भावार्थ रामायण: संत एकनाथ महाराज
श्री रामचरितमानस: गोस्वामी तुलसीदास
कंब रामायण: कवी कंबर (तमिळ)
उत्तररामचरितम्: कवी भवभूती
वास्तव रामायण: डॉ. पद्माकर विष्णू वर्तक
सर्व ग्रंथ संपदा पाहा