॥ श्री रामरक्षा स्तोत्र माहात्म्य ॥
श्री रामरक्षा स्तोत्र हे बुधकौशिक ऋषींनी रचलेले एक अत्यंत शक्तिशाली आणि कवचस्वरूप स्तोत्र आहे. दररोज या स्तोत्राचे भक्तिभावाने पठण केल्यास सर्व प्रकारची संकटे, भीती दूर होऊन प्रभू श्रीरामचंद्रांची कृपा आणि संरक्षण प्राप्त होते.
🚩 श्री रामरक्षा स्तोत्रम्
॥ ॐ श्रीगणेशाय नमः ॥
अस्य श्रीरामरक्षास्तोत्रमन्त्रस्य । बुधकौशिक ऋषिः ।
श्रीसीतारामचन्द्रो देवता । अनुष्टुप् छन्दः ।
सीता शक्तिः । श्रीमद् हनुमान कीलकम् ।
श्रीरामचन्द्रप्रीत्यर्थे रामरक्षास्तोत्रजपे विनियोगः ॥
अस्य श्रीरामरक्षास्तोत्रमन्त्रस्य । बुधकौशिक ऋषिः ।
श्रीसीतारामचन्द्रो देवता । अनुष्टुप् छन्दः ।
सीता शक्तिः । श्रीमद् हनुमान कीलकम् ।
श्रीरामचन्द्रप्रीत्यर्थे रामरक्षास्तोत्रजपे विनियोगः ॥
मराठी अर्थ:
श्री गणेशाय नमः. या श्री रामरक्षा स्तोत्र मंत्राचे ऋषी बुधकौशिक आहेत. श्री सीता-रामचंद्र ही देवता आहे. अनुष्टुप हा छंद आहे. सीता ही शक्ती आहे. श्रीमद् हनुमान हे कीलक आहेत आणि श्री सीता-रामचंद्रांच्या प्रीत्यर्थ या जपाचा विनियोग केला जात आहे.
✨ santvani.co.in
🚩 श्री रामरक्षा स्तोत्रम्
॥ अथ ध्यानम् ॥
ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं
पीतं वासो वसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नम् ।
वामाङ्कारूढ सीतामुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं
नानालङ्कारदीप्तं दधतमुरुजटामण्डनं रामचन्द्रम् ॥
ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं
पीतं वासो वसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नम् ।
वामाङ्कारूढ सीतामुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं
नानालङ्कारदीप्तं दधतमुरुजटामण्डनं रामचन्द्रम् ॥
मराठी अर्थ:
ज्यांचे हात गुडघ्यांपर्यंत लांब आहेत, धनुष्य-बाण धारण केलेले, पीतांबरधारी, कमलनेत्र, प्रसन्नवदन, डाव्या मांडीवर बसलेल्या सीतामातेच्या मुखाकडे पाहणारे आणि विविध अलंकारांनी शोभणाऱ्या श्रीरामचंद्रांचे मी ध्यान करतो.
✨ santvani.co.in
🚩 श्री रामरक्षा स्तोत्रम्
चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् ।
एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम् ॥ १॥
एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम् ॥ १॥
मराठी अर्थ:
श्री रघुनाथांचे चरित्र शंभर कोटी ओव्यांइतके विस्तीर्ण आहे. त्यातील एकेक अक्षरसुद्धा मनुष्याच्या महापापांचा नाश करणारे आहे.
✨ santvani.co.in
🚩 श्री रामरक्षा स्तोत्रम्
ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनम् ।
जानकीलक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितम् ॥ २॥
जानकीलक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितम् ॥ २॥
मराठी अर्थ:
निळ्या कमळाप्रमाणे श्यामल व कमलनेत्र असलेल्या, जानकी व लक्ष्मणासह विराजमान असलेल्या आणि जटामुकुटाने शोभणाऱ्या श्रीरामांचे ध्यान करून...
✨ santvani.co.in
🚩 श्री रामरक्षा स्तोत्रम्
सासितूणधनुर्बाणपाणिं नक्तञ्चरान्तकम् ।
स्वलीलया जगत्त्रातुमाविर्भूतमजं विभुम् ॥ ३॥
स्वलीलया जगत्त्रातुमाविर्भूतमजं विभुम् ॥ ३॥
मराठी अर्थ:
हातात तलवार, भाता, धनुष्य आणि बाण धारण करणाऱ्या, राक्षसांचा अंत करणाऱ्या आणि जगद्रक्षणासाठी अवतार घेतलेल्या श्रीरामांचे ध्यान करून...
✨ santvani.co.in
🚩 श्री रामरक्षा स्तोत्रम्
रामरक्षां पठेत्प्राज्ञः पापघ्नीं सर्वकामदाम् ।
शिरो मे राघवः पातु भालं दशरथात्मजः ॥ ४॥
शिरो मे राघवः पातु भालं दशरथात्मजः ॥ ४॥
मराठी अर्थ:
ज्ञान्याने सर्व पापांचा नाश करणाऱ्या रामरक्षेचे पठण करावे. राघव माझ्या मस्तकाचे आणि दशरथपुत्र माझ्या कपाळाचे रक्षण करोत.
✨ santvani.co.in
🚩 श्री रामरक्षा स्तोत्रम्
कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रप्रियः श्रुती ।
घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः ॥ ५॥
घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः ॥ ५॥
मराठी अर्थ:
कौसल्येचा पुत्र माझ्या डोळ्यांचे, विश्वामित्रांचा प्रिय माझ्या कानांचे, यज्ञाचे रक्षण करणारे नाकाचे आणि लक्ष्मणावर प्रेम करणारे मुखाचे रक्षण करोत.
✨ santvani.co.in
🚩 श्री रामरक्षा स्तोत्रम्
जिह्वां विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवन्दितः ।
स्कन्धौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः ॥ ६॥
स्कन्धौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः ॥ ६॥
मराठी अर्थ:
विद्यानिधी माझ्या जिभेचे, भरताने वंदन केलेले कंठाचे, दिव्य आयुधे धारण करणारे खांद्यांचे आणि शिवधनुष्य मोडणारे माझ्या दोन्ही हातांचे रक्षण करोत.
✨ santvani.co.in
🚩 श्री रामरक्षा स्तोत्रम्
करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्न्यजित् ।
मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः ॥ ७॥
मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः ॥ ७॥
मराठी अर्थ:
सीतापती माझ्या हातांचे, परशुरामाला जिंकणारे हृदयाचे, खर राक्षसाचा नाश करणारे मध्यभागाचे आणि जांबवंताला आश्रय देणारे माझ्या नाभीचे रक्षण करोत.
✨ santvani.co.in
🚩 श्री रामरक्षा स्तोत्रम्
सुग्रीवेशः कटी पातु सक्थिनी हनुमत्प्रभुः ।
ऊरू रघूत्तमः पातु रक्षःकुलविनाशकृत् ॥ ८॥
ऊरू रघूत्तमः पातु रक्षःकुलविनाशकृत् ॥ ८॥
मराठी अर्थ:
सुग्रीवाचा स्वामी कमरेचे, हनुमानाचा स्वामी मांड्यांचे आणि राक्षसकुळाचा नाश करणारे रघूत्तम माझ्या मांड्यांच्या वरच्या भागाचे रक्षण करोत.
✨ santvani.co.in
🚩 श्री रामरक्षा स्तोत्रम्
जानुनी सेतुकृत्पातु जङ्घे दशमुखान्तकः ।
पादौ बिभीषणश्रीदः पातु रामोऽखिलं वपुः ॥ ९॥
पादौ बिभीषणश्रीदः पातु रामोऽखिलं वपुः ॥ ९॥
मराठी अर्थ:
सेतू बांधणारे गुडघ्यांचे, रावणाचा अंत करणारे नडगीचे, बिभीषणाला ऐश्वर्य देणारे चरणांचे आणि श्रीराम माझ्या संपूर्ण शरीराचे रक्षण करोत.
✨ santvani.co.in
🚩 श्री रामरक्षा स्तोत्रम्
एतां रामबलोपेतां रक्षां यः सुकृती पठेत् ।
स चिरायुः सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् ॥ १०॥
स चिरायुः सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् ॥ १०॥
मराठी अर्थ:
जो पुण्यवान मनुष्य रामबलाने युक्त असलेल्या या रामरक्षेचे पठण करतो, तो दीर्घायुषी, सुखी, पुत्रवान, विजयी आणि नम्र होतो.
✨ santvani.co.in
🚩 श्री रामरक्षा स्तोत्रम्
पातालभूतलव्योमचारिणश्छद्मचारिणः ।
न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः ॥ ११॥
न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः ॥ ११॥
मराठी अर्थ:
पाताळ, पृथ्वी किंवा आकाशात फिरणारे दुष्ट जीव रामनामाने रक्षित असलेल्या मनुष्याकडे पाहूही शकत नाहीत.
✨ santvani.co.in
🚩 श्री रामरक्षा स्तोत्रम्
रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन् ।
नरो न लिप्यते पापैः भुक्तिं मुक्तिं च विन्दति ॥ १२॥
नरो न लिप्यते पापैः भुक्तिं मुक्तिं च विन्दति ॥ १२॥
मराठी अर्थ:
राम, रामभद्र किंवा रामचंद्र या नावांचे स्मरण करणारा मनुष्य पापांनी लिप्त होत नाही; त्याला भोग आणि मुक्ती दोन्ही प्राप्त होतात.
✨ santvani.co.in
🚩 श्री रामरक्षा स्तोत्रम्
जगज्जैत्रैकमन्त्रेण रामनाम्नाभिरक्षितम् ।
यः कण्ठे धारयेत्तस्य करस्थाः सर्वसिद्धयः ॥ १३॥
यः कण्ठे धारयेत्तस्य करस्थाः सर्वसिद्धयः ॥ १३॥
मराठी अर्थ:
जगाला जिंकणाऱ्या रामनाम मंत्राने संरक्षित असलेल्या या स्तोत्राला जो कंठात धारण करतो, त्याच्या हातात सर्व सिद्धी प्राप्त होतात.
✨ santvani.co.in
🚩 श्री रामरक्षा स्तोत्रम्
वज्रपञ्जरनामेदं यो रामकवचं स्मरेत् ।
अव्याहताज्ञः सर्वत्र लभते जयमङ्गलम् ॥ १४॥
अव्याहताज्ञः सर्वत्र लभते जयमङ्गलम् ॥ १४॥
मराठी अर्थ:
'वज्रपंजर' नावाच्या या रामकवचाचे जो स्मरण करतो, त्याला सर्वत्र विजय आणि मंगल प्राप्त होते.
✨ santvani.co.in
🚩 श्री रामरक्षा स्तोत्रम्
आदिष्टवान् यथा स्वप्ने रामरक्षामिमां हरः ।
तथा लिखितवान् प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः ॥ १५॥
तथा लिखितवान् प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः ॥ १५॥
मराठी अर्थ:
भगवान शिवाने स्वप्नात बुधकौशिक ऋषींना जशी रामरक्षा सांगितली, तशीच त्यांनी सकाळी उठल्यावर लिहून काढली.
✨ santvani.co.in
🚩 श्री रामरक्षा स्तोत्रम्
आरामः कल्पवृक्षाणां विरामः सकलापदाम् ।
अभिरामस्त्रिलोकानां रामः श्रीमान् स नः प्रभुः ॥ १६॥
अभिरामस्त्रिलोकानां रामः श्रीमान् स नः प्रभुः ॥ १६॥
मराठी अर्थ:
जे कल्पवृक्षांचे उद्यान, सर्व आपत्तींचा अंत करणारे आणि तिन्ही लोकांत प्रिय आहेत, ते श्रीराम आमचे प्रभु आहेत.
✨ santvani.co.in
🚩 श्री रामरक्षा स्तोत्रम्
तरुणौ रूपसम्पन्नौ सुकुमारौ महाबलौ ।
पुण्डरीकविशालाक्षौ चीरकृष्णाजिनाम्बरौ ॥ १७॥
पुण्डरीकविशालाक्षौ चीरकृष्णाजिनाम्बरौ ॥ १७॥
मराठी अर्थ:
जे तरुण, रूपवान, सुकुमार, महाबलवान, कमळाप्रमाणे विशाल डोळे असलेले आणि वल्कले व मृगछाला धारण करणारे आहेत...
✨ santvani.co.in
🚩 श्री रामरक्षा स्तोत्रम्
फलमूलाशिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ ।
पुत्रौ दशरथस्यैतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ ॥ १८॥
पुत्रौ दशरथस्यैतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ ॥ १८॥
मराठी अर्थ:
फळ-मुळे खाणारे, तपस्वी, ब्रह्मचारी आणि दशरथाचे पुत्र असलेले राम आणि लक्ष्मण हे दोघे भाऊ...
✨ santvani.co.in
🚩 श्री रामरक्षा स्तोत्रम्
शरण्यौ सर्वसत्त्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मताम् ।
रक्षः कुलनिहन्तारौ त्रायेतां नो रघूत्तमौ ॥ १९॥
रक्षः कुलनिहन्तारौ त्रायेतां नो रघूत्तमौ ॥ १९॥
मराठी अर्थ:
सर्व प्राण्यांना शरण देणारे, श्रेष्ठ धनुर्धर आणि राक्षसांचा संहार करणारे रघूत्तम आमचे रक्षण करोत.
✨ santvani.co.in
🚩 श्री रामरक्षा स्तोत्रम्
आत्तसज्जधनुषाविषुस्पृशावक्षयाशुगनिषङ्गसङ्गिनौ ।
रक्षणाय मम रामलक्ष्मणावग्रतः पथि सदैव गच्छताम् ॥ २०॥
रक्षणाय मम रामलक्ष्मणावग्रतः पथि सदैव गच्छताम् ॥ २०॥
मराठी अर्थ:
सज्ज धनुष्य-बाण घेतलेले आणि अक्षय्य भाता पाठीवर असलेले राम-लक्ष्मण माझ्या रक्षणासाठी मार्गात सदैव माझ्यापुढे चालोत.
✨ santvani.co.in
🚩 श्री रामरक्षा स्तोत्रम्
सन्नद्धः कवची खड्गी चापबाणधरो युवा ।
गच्छन्मनोरथोऽस्माकं रामः पातु सलक्ष्मणः ॥ २१॥
गच्छन्मनोरथोऽस्माकं रामः पातु सलक्ष्मणः ॥ २१॥
मराठी अर्थ:
कवच, तलवार आणि धनुष्य-बाण धारण केलेले तरुण श्रीराम लक्ष्मणासह आमचे रक्षण करोत.
✨ santvani.co.in
🚩 श्री रामरक्षा स्तोत्रम्
रामो दाशरथिः शूरो लक्ष्मणानुचरो बली ।
काकुत्स्थः पुरुषः पूर्णः कौसल्येयो रघूत्तमः ॥ २२॥
काकुत्स्थः पुरुषः पूर्णः कौसल्येयो रघूत्तमः ॥ २२॥
मराठी अर्थ:
राम, दाशरथी, शूरवीर, लक्ष्मणाचा पाठीराखा, बलवान, पूर्ण पुरुष, कौसल्यापुत्र आणि रघूत्तम...
✨ santvani.co.in
🚩 श्री रामरक्षा स्तोत्रम्
वेदान्तवेद्यो यज्ञेशः पुराणपुरुषोत्तमः ।
जानकीवल्लभः श्रीमान् अप्रमेय पराक्रमः ॥ २३॥
जानकीवल्लभः श्रीमान् अप्रमेय पराक्रमः ॥ २३॥
मराठी अर्थ:
वेदांताने जाणण्यायोग्य, यज्ञाचा स्वामी, पुराणपुरुषोत्तम, जानकीचा प्रियपती आणि अगाध पराक्रमी श्रीराम...
✨ santvani.co.in
🚩 श्री रामरक्षा स्तोत्रम्
इत्येतानि जपन्नित्यं मद्भक्तः श्रद्धयान्वितः ।
अश्वमेधाधिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशयः ॥ २४॥
अश्वमेधाधिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशयः ॥ २४॥
मराठी अर्थ:
या नामांचा रोज श्रद्धेने जप करणारा माझा भक्त अश्वमेध यज्ञापेक्षाही अधिक पुण्य प्राप्त करतो, यात शंका नाही.
✨ santvani.co.in
🚩 श्री रामरक्षा स्तोत्रम्
रामं दूर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाससम् ।
स्तुवन्ति नामभिर्दिव्यैः न ते संसारिणो नराः ॥ २५॥
स्तुवन्ति नामभिर्दिव्यैः न ते संसारिणो नराः ॥ २५॥
मराठी अर्थ:
दूर्वांप्रमाणे श्यामल, कमलनेत्र व पीतांबरधारी श्रीरामांची या दिव्य नावांनी स्तुती करणारे मनुष्य संसारात अडकत नाहीत.
✨ santvani.co.in
🚩 श्री रामरक्षा स्तोत्रम्
रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरम् ।
काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकम् ।
राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिम् ।
वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिम् ॥ २६॥
काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकम् ।
राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिम् ।
वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिम् ॥ २६॥
मराठी अर्थ:
लक्ष्मणाचा भाऊ, सीतापती, करुणासागर, राजांचा राजा, सत्यप्रतिज्ञ, शांतमूर्ती व रावणाचा शत्रू अशा श्रीरामाला मी नमस्कार करतो.
✨ santvani.co.in
🚩 श्री रामरक्षा स्तोत्रम्
रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे ।
रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः ॥ २७॥
रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः ॥ २७॥
मराठी अर्थ:
राम, रामभद्र, रामचंद्र, सृष्टीचे कर्ते, रघुनाथ आणि सीतेच्या पतीला माझा नमस्कार असो.
✨ santvani.co.in
🚩 श्री रामरक्षा स्तोत्रम्
श्रीराम राम रघुनन्दन राम राम ।
श्रीराम राम भरताग्रज राम राम ।
श्रीराम राम रणकर्कश राम राम ।
श्रीराम राम शरणं भव राम राम ॥ २८॥
श्रीराम राम भरताग्रज राम राम ।
श्रीराम राम रणकर्कश राम राम ।
श्रीराम राम शरणं भव राम राम ॥ २८॥
मराठी अर्थ:
हे रघुनंदन राम! हे भरताचे श्रेष्ठ बंधू राम! हे युद्धात पराक्रमी राम! हे श्रीराम, मला शरण घ्या, माझा सांभाळ करा.
✨ santvani.co.in
🚩 श्री रामरक्षा स्तोत्रम्
श्रीरामचन्द्रचरणौ मनसा स्मरामि ।
श्रीरामचन्द्रचरणौ वचसा गृणामि ।
श्रीरामचन्द्रचरणौ शिरसा नमामि ।
श्रीरामचन्द्रचरणौ शरणं प्रपद्ये ॥ २९॥
श्रीरामचन्द्रचरणौ वचसा गृणामि ।
श्रीरामचन्द्रचरणौ शिरसा नमामि ।
श्रीरामचन्द्रचरणौ शरणं प्रपद्ये ॥ २९॥
मराठी अर्थ:
मी मनाने श्रीरामचंद्रांच्या चरणांचे स्मरण करतो, वाणीने यश गातो, मस्तकाने वंदन करतो आणि त्यांच्या चरणांना शरण जातो.
✨ santvani.co.in
🚩 श्री रामरक्षा स्तोत्रम्
माता रामो मत्पिता रामचन्द्रः ।
स्वामी रामो मत्सखा रामचन्द्रः ।
सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालु- ।
र्नान्यं जाने नैव जाने न जाने ॥ ३०॥
स्वामी रामो मत्सखा रामचन्द्रः ।
सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालु- ।
र्नान्यं जाने नैव जाने न जाने ॥ ३०॥
मराठी अर्थ:
श्रीराम माझी माता, पिता, स्वामी आणि मित्र आहेत. दयाळू रामचंद्र हेच माझे सर्वस्व आहेत; मी दुसऱ्या कोणालाही जाणत नाही.
✨ santvani.co.in
🚩 श्री रामरक्षा स्तोत्रम्
दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा ।
पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनम् ॥ ३१॥
पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनम् ॥ ३१॥
मराठी अर्थ:
ज्यांच्या उजव्या बाजूला लक्ष्मण, डाव्या बाजूला जानकीमाता आणि समोर हनुमानजी आहेत, त्या रघुनंदन श्रीरामाला मी नमस्कार करतो.
✨ santvani.co.in
🚩 श्री रामरक्षा स्तोत्रम्
लोकाभिरामं रणरङ्गधीरं ।
राजीवनेत्रं रघुवंशनाथम् ।
कारुण्यरूपं करुणाकरं तं ।
श्रीरामचन्द्रम् शरणं प्रपद्ये ॥ ३२॥
राजीवनेत्रं रघुवंशनाथम् ।
कारुण्यरूपं करुणाकरं तं ।
श्रीरामचन्द्रम् शरणं प्रपद्ये ॥ ३२॥
मराठी अर्थ:
लोकांत सुंदर, रणांगणात धीरगंभीर, कमलनेत्र, रघुवंशाचे स्वामी आणि करुणामूर्ती श्रीरामचंद्रांना मी शरण जातो.
✨ santvani.co.in
🚩 श्री रामरक्षा स्तोत्रम्
मनोजवं मारुततुल्यवेगं ।
जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् ।
वातात्मजं वानरयूथमुख्यं ।
श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ॥ ३३॥
जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् ।
वातात्मजं वानरयूथमुख्यं ।
श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ॥ ३३॥
मराठी अर्थ:
मनासारखा वेग, वाऱ्यासारखी गती असलेल्या, जितेद्रिय, बुद्धिमंतांत श्रेष्ठ आणि वायुपुत्र असलेल्या श्रीरामदूत हनुमानाला मी शरण जातो.
✨ santvani.co.in
🚩 श्री रामरक्षा स्तोत्रम्
कूजन्तं रामरामेति मधुरं मधुराक्षरम् ।
आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम् ॥ ३४॥
आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम् ॥ ३४॥
मराठी अर्थ:
कवितेच्या फांदीवर बसून अत्यंत मधुर आवाजात 'राम-राम' असे गान करणाऱ्या वाल्मीकी रूपी कोकिळेला मी वंदन करतो.
✨ santvani.co.in
🚩 श्री रामरक्षा स्तोत्रम्
आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदाम् ।
लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् ॥ ३५॥
लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् ॥ ३५॥
मराठी अर्थ:
सर्व संकटांचे हरण करणाऱ्या, सर्व संपत्ती देणाऱ्या आणि लोकांना आनंद देणाऱ्या श्रीरामाला मी वारंवार नमस्कार करतो.
✨ santvani.co.in
🚩 श्री रामरक्षा स्तोत्रम्
भर्जनं भवबीजानामर्जनं सुखसम्पदाम् ।
तर्जनं यमदूतानां रामरामेति गर्जनम् ॥ ३६॥
तर्जनं यमदूतानां रामरामेति गर्जनम् ॥ ३६॥
मराठी अर्थ:
'राम-राम' अशी गर्जना करणे म्हणजे जन्म-मरणाच्या बीजाचा नाश करणे, सुख-संपत्ती मिळवणे आणि यमदूतांना पळवून लावणे होय.
✨ santvani.co.in
🚩 श्री रामरक्षा स्तोत्रम्
रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे
रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः ।
रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं
रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर ॥ ३७॥
रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः ।
रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं
रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर ॥ ३७॥
मराठी अर्थ:
श्रीराम नेहमी विजयी होतात. मी रामाचे भजन करतो. ज्यांनी राक्षसांचा संहार केला त्या रामाला नमस्कार. मी रामाचा दास आहे, माझे चित्त रामाच्या चरणी लीन राहो. हे रामा, माझा उद्धार कर!
✨ santvani.co.in
🚩 श्री रामरक्षा स्तोत्रम्
रामरामेति रामेति रमे रामे मनोरमे ।
सहस्रनामतत्तुल्यं रामनाम वरानने ॥ ३८॥
इति श्रीबुधकौशिकविरचितं श्रीरामरक्षास्तोत्रं सम्पूर्णम् ॥
॥ श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु ॥
सहस्रनामतत्तुल्यं रामनाम वरानने ॥ ३८॥
इति श्रीबुधकौशिकविरचितं श्रीरामरक्षास्तोत्रं सम्पूर्णम् ॥
॥ श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु ॥
मराठी अर्थ:
भगवान शिव म्हणतात: "हे सुमुखी! मी राम या मनमोहक नामात सदैव रममाण होतो. श्रीराम हे एक नाव विष्णूच्या १,००० नावांच्या समान आहे." बुधकौशिक ऋषी रचित श्री रामरक्षा स्तोत्र संपूर्ण झाले.
✨ santvani.co.in
🚩 जय श्री राम!
हे पावन सार्थ रामरक्षा स्तोत्र इतर रामभक्तांसोबत नक्की शेअर करा.
॥ श्री सीता-रामचंद्रार्पणमस्तु ॥