॥ श्री गणपती अथर्वशीर्ष माहात्म्य ॥
श्री गणपती अथर्वशीर्ष हे अथर्ववेदाचा एक भाग असून यामध्ये श्री गणेशाला प्रत्यक्ष परब्रह्म मानले आहे. 'अथर्व' म्हणजे एकाग्र मन आणि 'शीर्ष' म्हणजे मस्तक. बुद्धी, सुख, शांती आणि विघ्नांचा नाश करण्यासाठी दररोज भक्तिभावाने अथर्वशीर्षाचे पठण करावे.
🚩 श्री गणपती अथर्वशीर्ष
'श्री गणेशाय नम:'
ॐ भद्रं कर्णेभि शृणुयाम देवा: । भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्रा: ॥
स्थिरै रंगै स्तुष्टुवां सहस्तनुभि: । व्यशेम देवहितं यदायु: ॥१॥
ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवा: । स्वस्ति न: पूषा विश्ववेदा: ॥
स्वस्ति न स्तार्क्ष्र्यो अरिष्ट नेमि: । स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ॥२॥
ॐ शांति: । शांति: ।। शांति: ॥

मराठी अर्थ:
श्री गणेशाय नमः. हे देवा, आम्ही कानांनी कल्याणकारी ऐकावे, डोळ्यांनी सुंदर-कल्याणकारी पाहावे. आमचे शरीर सुदृढ राहो आणि देवाने दिलेले आयुष्य सत्कर्मात जावो. महान कीर्ती असलेला इंद्र, सर्वज्ञ पूषा, गरुड आणि बृहस्पति आमचे कल्याण करोत. ॐ शांती शांती शांती.
✨ santvani.co.in
🚩 श्री गणपती अथर्वशीर्ष
ॐ नमस्ते गणपतये ।
त्वमेव प्रत्यक्षं तत्वमसि ॥
त्वमेव केवलं कर्त्ताऽसि । त्वमेव केवलं धर्तासि ॥
त्वमेव केवलं हर्ताऽसि । त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि ॥
त्वं साक्षादत्मासि नित्यम् ॥१॥
त्वमेव प्रत्यक्षं तत्वमसि ॥
त्वमेव केवलं कर्त्ताऽसि । त्वमेव केवलं धर्तासि ॥
त्वमेव केवलं हर्ताऽसि । त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि ॥
त्वं साक्षादत्मासि नित्यम् ॥१॥
मराठी अर्थ:
ॐकारपती भगवान श्री गणेशाला माझा नमस्कार असो! हे गणेशा, तूच प्रत्यक्ष मूळ तत्त्व आहेस. तूच या सृष्टीचा एकमेव कर्ता, धर्ता (पालनकर्ता) आणि हर्ता (संहारकर्ता) आहेस. तूच निसंशय सर्वव्यापी ब्रह्म आहेस आणि नित्य साक्षात आत्मस्वरूप आहेस.
✨ santvani.co.in
🚩 श्री गणपती अथर्वशीर्ष
ऋतं वच्मि । सत्यं वच्मि ॥
अव त्वं मां । अव वक्तारं । अव श्रोतारं । अवदातारं ॥
अव धातारम अवानूचानमवशिष्यं ॥
अव पश्चातात् । अवं पुरस्तात् । अवोत्तरातात् । अव दक्षिणात्तात् ॥
अव चोर्ध्वात्तात । अवाधरात्तात । सर्वतो मां पाहिपाहि समंतात् ॥३॥

मी न्यायसंगत आणि सत्यच बोलतो. हे पार्वतीपुत्र गणेशा, तू माझे (शिष्याचे) रक्षण कर, वक्त्याचे, ऐकणाऱ्याचे, दात्याचे, धारण करणाऱ्याचे, शिकवणाऱ्या गुरूंचे आणि शिष्याचे रक्षण कर. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, वर आणि खाली अशा सर्व दिशांनी माझे सदैव रक्षण कर.
✨ santvani.co.in
🚩 श्री गणपती अथर्वशीर्ष
त्वं वाङग्मयचस्त्वं चिन्मय ।
त्वं वाङग्मयचस्त्वं ब्रह्ममय: ॥
त्वं सच्चिदानंदा द्वितियोऽसि । त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि ।
त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि ॥४॥
त्वं वाङग्मयचस्त्वं ब्रह्ममय: ॥
त्वं सच्चिदानंदा द्वितियोऽसि । त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि ।
त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि ॥४॥
मराठी अर्थ:
तू वाङ्मय (वाणी) आणि चिन्मय (चैतन्य) आहेस. तू आनंदमय आणि ब्रह्ममय आहेस. तूच अद्वितीय सच्चिदानंद (सत्य-चित्-आनंद) आहेस. तू प्रत्यक्ष परब्रह्म, ज्ञानमय आणि विज्ञानमय आहेस.
✨ santvani.co.in
🚩 श्री गणपती अथर्वशीर्ष
सर्व जगदिदं त्वत्तो जायते । सर्व जगदिदं त्वत्तस्तिष्ठति ॥
सर्व जगदिदं त्वयि लयमेष्यति । सर्व जगदिदं त्वयि प्रत्येति ॥
त्वं भूमिरापोनलोऽनिलो नभ: । त्वं चत्वारिवाक्पदानी ॥५॥
सर्व जगदिदं त्वयि लयमेष्यति । सर्व जगदिदं त्वयि प्रत्येति ॥
त्वं भूमिरापोनलोऽनिलो नभ: । त्वं चत्वारिवाक्पदानी ॥५॥
मराठी अर्थ:
हे संपूर्ण जग तुझ्यापासूनच निर्माण होते, तुझ्या आधारानेच टिकून राहते आणि शेवटी तुझ्यातच विलीन होते. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश ही पंचमहाभूते तूच आहेस. परा, पश्यंती, मध्यमा व वैखरी या वाणीची चारही रूपे तूच आहेस.
✨ santvani.co.in
🚩 श्री गणपती अथर्वशीर्ष
त्वं गुणयत्रयातीत: त्वमवस्थात्रयातीत: ।
त्वं देहत्रयातीत: त्वं कालत्रयातीत: ॥
त्वं मूलाधार स्थितोऽसि नित्यं । त्वं शक्ति त्रयात्मक: ॥
त्वां योगिनो ध्यायंति नित्यम् । त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं ।
वायुस्त्वं सूर्यस्त्वं चंद्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुव: स्वरोम् ॥६॥

तू सत्व-रज-तम तिन्ही गुणांच्या पलीकडचा, तिन्ही अवस्था (जागृती, स्वप्न, सुषुप्ती), तिन्ही देह आणि तिन्ही काळांच्या पलीकडचा आहेस. तू शरीरातील मूलाधार चक्रात नित्य राहतोस. इच्छा, क्रिया व ज्ञान या तिन्ही शक्ती तूच आहेस. योगीजन तुझे नित्य ध्यान करतात. तूच ब्रह्मा, विष्णू, रुद्र, इंद्र, अग्नी, वायू, सूर्य, चंद्र आणि भूः-भुवः-स्वः ॐकार आहेस.
✨ santvani.co.in
🚩 श्री गणपती अथर्वशीर्ष
गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनंतरं ॥
अनुस्वार: परतर: । अर्धेन्दुलसितं । तारेण ऋद्धं ॥
एतत्तव मनुस्वरूपं । गकार: पूर्व रूपं अकारो मध्यरूपं ॥
अनुस्वारश्चान्त्य रूपं । बिन्दुरूत्तर रूपं । नाद: संधानं ॥
संहिता संधि: सैषा गणेश विद्या । गणक ऋषि: निचृद्रायत्रीछंद: ॥
गणपति देवता । ॐ गं गणपतये नम: ॥७॥

गणाचा आधीचा अक्षर 'ग्' आधी उच्चारून, नंतर वर्णातील प्रथम 'अ' जोडून त्यावर अनुस्वार व अर्धचंद्र शोभणारा 'गं' हा बीजमंत्र बनतो. या गणेश विद्येचे गणक ऋषी आहेत, निचृद्गायत्री छंद आहे आणि गणपती ही देवता आहे. हा महामंत्र 'ॐ गं गणपतये नमः' असा आहे.
✨ santvani.co.in
🚩 श्री गणपती अथर्वशीर्ष
एकदंताय विद्महे । वक्रतुण्डाय धीमहि तन्नोदंती प्रचोद्यात ॥
एकदंत चतुर्हस्तं पारामंकुशधारिणम् ॥
रदं च वरदं च हस्तै र्विभ्राणं मूषक ध्वजम् ॥
रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससम् ॥
रक्त गंधाऽनुलिप्तागं रक्तपुष्पै सुपूजितम् ॥८॥
एकदंत चतुर्हस्तं पारामंकुशधारिणम् ॥
रदं च वरदं च हस्तै र्विभ्राणं मूषक ध्वजम् ॥
रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससम् ॥
रक्त गंधाऽनुलिप्तागं रक्तपुष्पै सुपूजितम् ॥८॥
मराठी अर्थ:
आम्ही एकदंताला जाणतो, वक्रतुंडाचे ध्यान करतो; तो गजानन आमच्या बुद्धीला प्रेरणा देवो. चार हात असलेले, पाश, अंकुश, अभय आणि वरदमुद्रा धारण करणारे; मूषकध्वज, लाल वर्ण, लंबोदर, सुपासारखे कान, तांबडे वस्त्र नेसलेले, लाल चंदनाचा लेप लावलेले व तांबड्या फुलांनी पूजलेले श्रीगणेश!
✨ santvani.co.in
🚩 श्री गणपती अथर्वशीर्ष
भक्तानुकंपिन देवं जगत्कारणम्च्युतम् ॥
आविर्भूतं च सृष्टयादौ प्रकृतै: पुरुषात्परम ॥
एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनांवर: ॥९॥
आविर्भूतं च सृष्टयादौ प्रकृतै: पुरुषात्परम ॥
एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनांवर: ॥९॥
मराठी अर्थ:
भक्तांवर दया करणारे, जगाचे मूळ कारण, अविनाशी, सृष्टीच्या आरंभी प्रकट झालेले आणि प्रकृती-पुरुषाच्या पलीकडे असलेल्या श्रीगणेशाचे जो नित्य ध्यान करतो, तो सर्व योग्यांमध्ये श्रेष्ठ ठरतो.
✨ santvani.co.in
🚩 श्री गणपती अथर्वशीर्ष
नमो व्रातपतये नमो गणपतये । नम: प्रथमपत्तये ॥
नमस्तेऽस्तु लंबोदारायैकदंताय विघ्ननाशिने शिव सुताय ।
श्री वरदमूर्तये नमोनम: ॥१०॥
नमस्तेऽस्तु लंबोदारायैकदंताय विघ्ननाशिने शिव सुताय ।
श्री वरदमूर्तये नमोनम: ॥१०॥
मराठी अर्थ:
देवसमूहाच्या स्वामीला नमस्कार! गणपतीला नमस्कार! शिवाच्या मुख्य गणांच्या नायकाला नमस्कार! लंबोदर, एकदंत, विघ्ननाशक, शिवपुत्र आणि श्री वरदमूर्ती गणेशाला माझे वारंवार नम्र प्रणाम!
✨ santvani.co.in
🚩 श्री गणपती अथर्वशीर्ष
एतदथर्वशीर्ष योऽधीते । स: ब्रह्मभूयाय कल्पते ॥
स सर्वविघ्नैर्न बाध्यते स सर्वत: सुख मेधते ॥११॥
स सर्वविघ्नैर्न बाध्यते स सर्वत: सुख मेधते ॥११॥
मराठी अर्थ:
हे अथर्वशीर्ष उपनिषद जो वाचतो, तो ब्रह्मज्ञान मिळवण्यास पात्र होतो. त्याला कोणतेही विघ्न बाधू शकत नाही. तो सर्व ठिकाणी सुख प्राप्त करतो आणि पाचही महापापांपासून मुक्त होतो.
✨ santvani.co.in
🚩 श्री गणपती अथर्वशीर्ष
सायमधीयानो दिवसकृतं पापं नाशयति ॥
प्रातरधीयानो रात्रिकृतं पापं नाशयति ॥
सायं प्रात: प्रयुंजानो पापोद्भवति । सर्वत्राधीयानोऽपविघ्नो भवति ॥
धर्मार्थ काममोक्षं च विदंति ॥१२॥
प्रातरधीयानो रात्रिकृतं पापं नाशयति ॥
सायं प्रात: प्रयुंजानो पापोद्भवति । सर्वत्राधीयानोऽपविघ्नो भवति ॥
धर्मार्थ काममोक्षं च विदंति ॥१२॥
मराठी अर्थ:
संध्याकाळी पाठ करणारा दिवसा झालेली पापे नष्ट करतो. सकाळी पाठ करणारा रात्री झालेली पापे नष्ट करतो. दोन्ही वेळी पाठ करणारा निष्पाप होतो, सर्व विघ्नांवर मात करतो आणि धर्म, अर्थ, काम व मोक्ष प्राप्त करतो.
✨ santvani.co.in
🚩 श्री गणपती अथर्वशीर्ष
इदमथर्वशीर्षम शिष्यायन देयम ॥
यो यदि मोहाददास्यति स पापीयान भवति ॥
सहस्त्रावर्तनात् यं यं काममधीते तं तमनेन साधयेत ॥१३॥
यो यदि मोहाददास्यति स पापीयान भवति ॥
सहस्त्रावर्तनात् यं यं काममधीते तं तमनेन साधयेत ॥१३॥
मराठी अर्थ:
हे अथर्वशीर्ष श्रद्धा नसणाऱ्यास देऊ नये; मोहाने दिल्यास तो पापी ठरतो. या पाठाचे एक हजार वेळा आवर्तन केल्यास मनुष्य आपली कोणतीही मनोकामना पूर्ण करू शकतो.
✨ santvani.co.in
🚩 श्री गणपती अथर्वशीर्ष
अनेन गणपतिमभिषिंचति स वाग्मी भवति ॥
चतुर्थत्यां मनश्रन्न जपति स विद्यावान् भवति ॥
इत्यर्थर्वण वाक्यं । ब्रह्माद्यारवरणं विद्यात् न विभेती कदाचनेति ॥१४॥
चतुर्थत्यां मनश्रन्न जपति स विद्यावान् भवति ॥
इत्यर्थर्वण वाक्यं । ब्रह्माद्यारवरणं विद्यात् न विभेती कदाचनेति ॥१४॥
मराठी अर्थ:
याने जो गणपतीवर अभिषेक करतो तो उत्तम वक्ता होतो. चतुर्थीला उपवास धरून जप करणारा अत्यंत विद्यावान होतो. हे अथर्ववेदाचे वचन आहे; असा साधक कधीही कशालाही भजत नाही.
✨ santvani.co.in
🚩 श्री गणपती अथर्वशीर्ष
यो दूर्वां कुरैर्यजति स वैश्रवणोपमो भवति ॥
यो लाजैर्यजति स यशोवान भवति । स: मेधावान भवति ॥
यो मोदक सहस्त्रैण यजति । स वांञ्छित फलम् वाप्नोति ॥
य: साज्य समिभ्दर्भयजति, स सर्वं लभते स सर्वं लभते ॥१५॥
यो लाजैर्यजति स यशोवान भवति । स: मेधावान भवति ॥
यो मोदक सहस्त्रैण यजति । स वांञ्छित फलम् वाप्नोति ॥
य: साज्य समिभ्दर्भयजति, स सर्वं लभते स सर्वं लभते ॥१५॥
मराठी अर्थ:
जो दुर्वांकुरांनी पूजन करतो तो कुबेरासारखा श्रीमंत होतो. जो लाह्यांनी आहुती देतो तो थोर यशस्वी व बुद्धिवान होतो. जो १,००० मोदकांनी यज्ञ करतो त्याला इच्छित फळ मिळते. जो तूप व समिधांनी यज्ञ करतो त्याला सर्वकाही प्राप्त होते.
✨ santvani.co.in
🚩 श्री गणपती अथर्वशीर्ष
अष्टो ब्राह्मणानां सम्यग्राहयित्वा सूर्यवर्चस्वी भवति ॥
सूर्य गृहे महानद्यां प्रतिभासंनिधौ वा जपत्वा सिद्ध मंत्रोन् भवति ॥
महाविघ्नात्प्रमुच्यते । महादोषात्प्रमुच्यते । महापापात् प्रमुच्यते ॥
स सर्व विद्भवति स सर्वविद्भवति । य एवं वेद इत्युपनिषद ॥१६॥
॥ अथर्ववेदीय गणपत्युपनिषद् समाप्त ॥

आठ ब्राह्मणांना हा उपदेश दिल्यास मनुष्य सूर्यासारखा तेजस्वी होतो. सूर्यग्रहणात, महानदीच्या काठी किंवा मूर्तीजवळ जप केल्यास मंत्र सिद्ध होतो. तो महाविघ्न, महादोष व महापापांतून मुक्त होऊन सर्वज्ञ होतो.॥ अशा प्रकारे अथर्ववेदीय गणपती उपनिषद संपूर्ण झाले ॥
✨ santvani.co.in
🚩 गणपती बाप्पा मोरया!
हे पावन सार्थ श्री गणपती अथर्वशीर्ष इतर गणेशभक्तांसोबत नक्की शेअर करा.
॥ श्री सिद्धिविनायकार्पणमस्तु ॥