असों चरणावरी तुमच्या ठेऊनियां मन । करुनियां कीर्तन रुपीं तुमचियां दृष्टी ॥१॥
होईल ते हो कैसी आमुची गती । नेणों योगयुक्ति तप साधन दुसरें ॥२॥
सांगितलें संती करा नामाचा घोक । नलगे मग आणिक कृपा करील श्रीहरी ॥३॥
निळा म्हणे विश्वासें त्या राहिलों ठायी । ठेऊनियां पायीं जीवभाव सकळ ॥४॥