आजि पुरलें वो आतींचें आरत । होतें ह्रदयीं वो बहु दिवस चिंतित ।
मना आवरुनि इंद्रयां सतत । दृष्टी पाहों हा धणिवरी गोपिनाथ वो ॥१॥
तेंचि घडोनियां आलें अनाययासें । जातां यशोदे घरा वाणचिया मिसें ।
आला खेळत खेळत बाळवेषें । कवळी घालि मिठी गदगदां हांसे वो ॥२॥
मुख अमृताचा मयंक उगवला । दंत हियाचा प्रकाश फांकला ।
नयनीं रत्नकीळ तारा वो चमकला । देखतां ह्रदयीं निजवास त्याचा झाला वो ॥३॥
जन्म जन्मांतरी बहु केले सायास । याचें भेटिलागीं व्रतें उपवास ।
सेविलीं गंगेची तटाकें उदास । त्याचिया सुकृताचे आले नेणों घोष वो ॥४॥
आजि आनंदाशी आनंद माझया झाला । आजि सुखशीं सुखें लाभ केला
आजि हर्षाषीं हर्ष भेटों आला । तेणें श्रीरंग निजदृष्टी स्थिरावला वो ॥५॥
भोग भोगितां वो सरले समस्त । गेलें उडोनियां प्रारब्ध संचित ।
विटलें विषयावरुनियां चित्त । निळा म्हणे घडला हरिशीं एकांत वो ॥६॥