नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा । नमो सद्गुरु सच्चिदानंदरुपा ।
नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती । नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती ॥१॥
तुझ्या आठवीं वीसरे आपणातें । तरंगा जळीं घालितां जेवि होते ॥
अळंकार सोनेंचि होऊनि ठेला । निळा यापरी आठवी सद्गुरुला ॥२॥
तुका सद्गुरु हा तुका सद्गुरु हा । तुका नातुडे सच्चिदानंद तो हा ॥
जया मोहरा सर्व सिद्धांत जाले । न तुके महामौन्य घेऊनि ठेले ॥३॥
जनीं वीजनीं वोळती हा तुकावा । करीतां पुजा आणिती नित्य भावा ॥
स्फुरद्रूप तो सर्व जाणोनि नेणें । पहा सांडिलें सर्वसाक्षित्व जेणें ॥४॥
असदाग होणेंचि नाहीं जयातें । सदत्वासि कैसेनि येणें तयातें ॥
जडत्वासि जो नातळे चित्प्रकाशें । चिदाभास तो बोलिजे त्यासि कैसे ॥५॥
नव्हे दुःख आनंद त्यातें म्हणावें । आनंदासि आनंदता केंवि पावे ॥
नये देखतां बूबळें आपणासी । निळा यापरी आठवी सद्गुरुसी ॥६॥
मनुष्याकृती राघवें ख्याति केली । शिळाशीखरें सागरीं तारियेलीं ॥
तुकास्वामी हा पूर्णब्रह्म प्रकाशी । जळीं रक्षिलें निर्जिवा कागदासी ॥७॥
महाराज हा जन्मला मृत्युलोकीं । दुजी उपमा नाढळे ईहलोकीं ॥
भवसिंधुसी बांधिला सेतु जेणें । अनाथा दिनाकारणें तुकयानें ॥८॥
तुका हा तुका हा परब्रह्मरुपीं । तुकीतां तुका हा परब्रह्मरुपीं ।
तुकीतां तुका हा तुकला सत्स्वरुपीं ॥ तुकास्वामीतें नाम वाचेसि गातां ।
बहूसा निळा हा पावला वर्म हाता ॥९॥