बरवीं हीं गुंतली आपुल्या वचनें । निमित्तावरून भोवंडावी ॥१॥
विचारुनी ऐसें बोलिले सकळ । वदवीं अविकळ पशुमुखें ॥२॥
तुझा याचा आत्मा आहे एक जरी । वदवी ग्यान्या तरी येचि क्षणी ॥३॥
नाहीं तरी वृथा न करावी वल्गना । घेऊनियां पतना जावें स्थळा ॥४॥
म्हणती ज्ञानदेव तुमच्याचि प्रसादें । करील घोष वेद म्हैशी पुत्र ॥५॥
कराल तें काय नव्हे धरामर । पाषाणीं ईश्वर प्रतिमा स्थापा ॥६॥
ग्रंथत्रयामाजी सांगा जी निरुता । पढावा कोणता वेद येणें ॥७॥
ऐकोनि सकळ विस्मयें बोलती । ऋग्वेदचि म्हणती पढवा यासी ॥८॥
देऊनि वरदान केली आज्ञा त्यासी । पशू प्रारंभासी करिता झाला ॥९॥
मुख्य प्रणवाच्चार काढियेला स्वर । देखोनि द्विवर ठकावले ॥१०॥
लागली टकमक सांडलें निज धैर्या । म्हणती गेलों वायां दुराभिमानें ॥११॥
संहिता पद क्रम उपन्यास त्वरित । सूत्रादिनिरुक्त शिक्षा छंद ॥१२॥
अष्टाध्यायी मीमांसा आरण्यक ब्राह्मण । मांडिलें अध्ययन जुगादीचें ॥१३॥
बोलियेला म्हैसा वेदाच्या सुस्वारी । हें सकळ द्विजवरीं देखियेलें ॥१४॥
गळाले अभिमानें जाहले विगलित । चरणीं लोळत दीनपणें ॥१५॥
म्हणती हेचि देव तिन्ही मूर्तिमंत । मुक्ताई साद्यंत परामाया ॥१६॥
नेणोनियां महिमा चावळलों जी देवा । तो परिहार आतां द्यावा काय किती ॥१७॥
घडले जे अपराध ते ते करा क्षमा । अहो सिद्धोत्तमा विश्ववंद्या ॥१८॥
अज्ञान गर्वित गेलों जी अभिमानें । बोलियेलों वचनें अमर्यादे ॥१९॥
सर्वीं सर्व तुम्हीं सदा सर्वगत । कैंचें प्रायश्चित्त नित्यमुक्ता ॥२०॥
निमित्तें करुनि करितां उद्धार । जडजीवां आधार चरण तुमचे ॥२१॥
विश्वाच्या उद्धारा तुमचें अवतरण । कराया स्थापन स्वधर्माचें ॥२२॥
कळलेती यावरी विधीचे जनिते । व्यापूनी सकळांतें सगुणरूपी ॥२३॥
ऐशीं करुनि स्तवनें करिती दंडवत । आणि मागती आज्ञेतें विनीतता ॥२४॥
घेऊनि निरोप जाती मंदिरासी । म्हैसा देऊनि त्यासी पढीण म्हणू ॥२५॥
ऐकोनि अद्भुत ऐसा चमत्कार । येती नारीनर नमस्कारा ॥२६॥
घरोघरीं चर्चा स्त्रियाबाळें करिती । प्राणीमात्र वर्णिती कीर्ति त्यांची ॥२७॥
मिळोनि परस्परें विप्र अनुवादती । योग्यता हे म्हणती नकळे त्यांची ॥२८॥
आणीकही एक नवल वर्तलें । क्षेत्रींच्या देखिलें सर्व जनीं ॥२९॥
करिती विस्मयचर्चा तंव येर दिवशीं । श्राद्ध गृहस्थासी होतें घरीं ॥३०॥
तेणें त्या चौघांसी दिधलें निमंत्रण । त्याचे पितृगण आणियेले ॥३१॥
देऊन भोजन केले स्वर्गवासी । सांगितली ऐशी मात तेणें ॥३२॥
तें सादर चांगदेवें ऐकीयेलें श्रवणीं । आणखीही ब्राह्मणीं संनिधीच्या ॥३३॥
श्रवणेंचि सिद्धासी ताटस्थ्य लागलें । प्रश्नीं विचारिलें ज्योतिषमतें ॥३४॥
तंव तें सत्य ऐसें आलें अनुमाना । विस्मयें त्या नयनां अश्रू आले ॥३५॥
म्हणे हें तों नव्हे तपाचें सामर्थ्य । होती मूर्तिमंत देवची ते ॥३६॥
अपूर्व हे वार्ता नवलचि ऐकिली । पूर्वी नाहीं झाली नव्हे पुढें ॥३७॥
अनुतापें झाला उद्विग्न मानसीं । पुसे ब्राह्मणासी पुढतोपुढती ॥३८॥
कोण त्यांचा ग्राम झाले किती दिवस । द्विज म्हणे मास एक झाला ॥३९॥
इंद्रायणी तीरीं आहे अलंकापूर । तेथे निरंतर वास्तव्य त्यां ॥४०॥
पुसोनि ब्राह्मणा गेले नेवासिया । म्हैसा घेऊनियां समागमें ॥४१॥
ऐकोनि चांगदेवाने शिष्य पाचारिले । आणि एकांतासी गेले सांगती त्यां ॥४२॥
यावरी पूजन न करावें आमचें । सांगतो हें साचें धरा चित्तीं ॥४३॥
तंव ते विनविती होऊनि भयभीत । आज्ञा किंनिमित्त केली अशी ॥४४॥
आम्ही तों अज्ञान नेणों स्वामी सेवा । अपराध तो देवा कीजे क्षमा ॥४५॥
त्या म्हणती चांगदेव पूजेचे अधिकारी । आले महीवरी तेचि पूज्य ॥४६॥
जेवीं सूर्यवंशी अवतरतां राघव । राहिला भार्गव मागील मागें ॥४७॥
शिष्ट असतां पूज्य न द्यावी आपण । आहें प्रमाण वेदशास्त्रीं ॥४८॥
घडतां अमर्यादा जावें पतनासी । भय हें मानसीं बहुत वाटे ॥४९॥
शतमख करुनियां नहुष स्वर्गा गेला । परी अमर्यादेनें पावला सर्वत्व तो ॥५०॥
त्रिशंकू सगर ऐसे सांगों किती । अमर्यादेनें येती पतनद्वारा ॥५१॥
तरी ते पूज्य प्रकट झाले मूर्तिमंत । ऐकिलें तें सांप्रत याचि काळे ॥५२॥
नव्हती ते मानवी देवाचे अवतार । निवृत्ती ज्ञानेश्वर सोपानदेवो ॥५३॥
मुक्ताबाई आदिमाया हे जननी । केला प्रतिष्ठाणीं कीर्तिघोष ॥५४॥
म्हैसीपुत्रा मुखे बोलविल्या श्रुती । आश्चर्य हें चित्तीं बहुत वाटे ॥५५॥
जावें भेटीलागीं विचारलें मनीं । हे सिद्धी साधनीं नव्हे कोणा ॥५६॥
अनुतापें झाला संतप्त मानसीं । म्हणे सिद्धाईसी खेव आला ॥५७॥
तंव बोलती प्रबुद्ध त्यासीचि आणावें । अहो मूळ पाठवावें सिद्धराया ॥५८॥
सर्व सत्ता तुम्हां आहे जी स्वाधीन । राजे प्रजाजन आज्ञेमाजी ॥५९॥
तंव म्हणती चांगदेव नव्हे हा विचार । आज्ञेचा बडिवार कोणा अंगीं ॥६०॥
वंचूनियां काळा रक्षिलें शरीर । बहुत दिवस भार वाढविला ॥६१॥
परी हें सामर्थ्य नाहीं आम्हां अंगीं । जावें भेटीलागीं हेंचि सत्य ॥६२॥
जन्माचें सार्थक सिद्धाचीये भेटी । होईल या तुटी संसाराशी ॥६३॥
परी सिद्धपणा येईल उणीव । काय कीजे जीव तळमळी ॥६४॥
ते म्हणती देवा हे नव्हे सत्य वार्ता । म्हैसी केवीं वदता होईल वेदा ॥६५॥
आणि मृत स्वर्गवासी पितर कैसे येती । ते भोजने करुनि जाती हेंही मिथ्या ॥६६॥
स्वामीसी विश्वास वाटे भलतीयाचा । परी हा नव्हे साचा वर्तमान ॥६७॥
नाहीं ये वार्तेसी साक्ष पडताळा । बोलियेला वाचाळ मिथ्या द्विजा ॥६८॥
तया म्हणती चांगदेव प्रश्न म्यां पाहिला । तोही उतरिला यथार्थपणें ॥६९॥
तों शिष्य म्हणती देवा प्रश्नही चुकतो । न सांपडता जातो वेळ काळ ॥७०॥
हें ऐकोनी तयांसी सिद्ध म्हणती तुम्ही मूर्ख । अरे विद्या आहे चोख पंडित माझी ॥७१॥
तरी ते म्हणती जाहा रे प्रतिष्ठाना । आणि हें वर्तमान आणा यथातथ्य ॥७३॥
चिरंजीव सकळ क्षेत्रवासी द्विजां । आशीर्वाद माझा लिहा पत्रीं ॥७४॥
नवल हें ऐकिलें रेडा बोलविला । निगमाक्षरीं केला घोष तेणें ॥७५॥
स्वर्गस्थ पितर आणूनि जेवविले । पुनरपि बोळविले स्वर्गाप्रती ॥७६॥
साच कीं मिथ्या धाडावे लिहुनी । तें ऐकावया मनीं उत्कंठित ॥७७॥
सांगती शिष्यासी जाऊनी त्वरीत । यावे शीघ्रवंत वरावरी ॥७८॥
चालिले तेथूनी सत्वर ब्राह्मण । ते पावले पैठण गंगातीरा ॥७९॥
तीहीं ऐकोनी चांगदेवें पाठविलें पत्र । मिळाले सर्वत्र क्षेत्रावासी ॥८०॥
धूतवस्त्रावरी गोधूमाच्या राशी । मांडिलें पत्रासी पूजा केली ॥८१॥
आलिंगिले पत्र कंठीं शिरीं । वाचिलें समग्र श्रवण केलें ॥८२॥
कळला अभिप्रावो विस्मयें दाटलें । ते सिद्ध आठवले बाळवेशी ॥८३॥
फुंदती गाळिती उभय नेत्रीं जीवन । म्हणती धन्य ईश तिन्ही ॥८४॥
पूर्वार्जितें होती उत्तम गोमटीं । म्हणोनि ते दृष्टीं देखियेले ॥८५॥
मग म्हणती सिद्धासी झालें हे उपश्रुत । नवल जें अद्भुत वर्तलें येथें ॥८६॥
दिव्यक्रीडा ऐसे संत आचरीत । दिगंता धांवत वायांवरी ॥८७॥
कैसी विस्तारिली आख्या दूरदेशीं । आश्चर्य हेंचि मानसीं बहुत वाटे ॥८८॥
सन्मानुनी ब्राह्मणां दीधलें भोजन । वस्त्रें पांघरवून गौरविलें ॥८९॥
दिधली दक्षिणा मार्गी खर्चावया । पत्र लिहूनियां दिलें हातीं ॥९०॥
परात्परा सिद्धा गुरूसी नमन । पत्र अवलंबन केलें स्वामी ॥९१॥
विद्यार्थी ये आम्ही सर्वही ब्राह्मण । झालों सुखसंपन्न आशीर्वादें ॥९२॥
ऐकिली जे वार्ता सत्य वर्तली येथें । पढविलें पशूनें वेदघोषें ॥९३॥
गृहस्थाचे पितर आणुनी जेवविले । प्रत्यक्ष पाहिलें आपण नेत्रीं ॥९४॥
निवृत्ती ज्ञानेश्वर मुक्ताई सोपान । वय तों लहान बाळवेषी ॥९५॥
करुनि अशी क्रीडा येथुनी स्वार झाले । नेवासिया गेले महासिद्ध ॥९६॥
तया स्थळी केला भगवद्गीता अर्थ । दहा सहस्र ग्रंथ सिद्ध झाला ॥९७॥
बाबाजीपंतांनीं स्वहस्तें लिहिला । परी ओवीबद्ध केला ज्ञानेश्वरीं ॥९८॥
सच्चिदानंदबाबा ठेवियेलें नांव । शिक्षापिला भाव देखोनियां ॥९९॥
एक पशू दुजा सच्चिदानंदबाबा । शिष्य केले नभा नकळती ॥१००॥
येथूनियां जातां अळंकापुरीसी । पशू आळियापाशीं स्थापियेला ॥१॥
अजान वृक्ष तेथें ठेवियेली खूण । झालें निरूपण निवेदिलें ॥२॥
घेऊनियां पत्र द्विज आले ताप्तीतीरा । नमिलें वटेश्वरा चांगयासी ॥३॥
करुनि नमस्कार पत्र दिलें हातीं । नवलावो सांगती देखिला तो ॥४॥
म्हणती सत्य देवा अद्भुत चरित्र । वर्णिती सर्वत्र तेथिंचे जन ॥५॥
वाचिलीया पत्र म्हणती चांगदेव । वार्ता अभिनव नित्य नवी ॥६॥
विचारितां दिसे नव्हे सामान्य । गेला अभिमान गळोनियां ॥७॥
काय रे अतिक्रम करविला मज हातीं । फिटली असती भ्रांती पाहोनि त्यांतें ॥८॥
आतां तरी जावें म्हणती अलंकापुरा । सामग्री करा सिद्ध वेगीं ॥९॥
तंव शिष्यजन सर्व गृहस्थ मिळाले । सकळीं प्रार्थिले म्हणती देवा ॥१०॥
सिद्धाई कोणाची नाहीं स्थिरावत । तपाचें सामर्थ्य वेंचलीया ॥११॥
आहे नाहीं आतां त्याचें सिद्धपण । धाडा विचक्षण पाहोनि येती ॥१२॥
मग तैशासारिखा करावा विचार । येणें येरझार चुके देवा ॥१३॥
मग पाचारिले प्रौढ वृद्ध तपोराशी । जा म्हणती तयांसी अलंकापुरा ॥१४॥
वसती सिद्ध तेथें निवृत्ती ज्ञानेश्वर । सोपान मुनेश्वर मुक्ताबाई ॥१५॥
सिद्धपण त्यांचे आहे कीं वेंचलें । तें पाहोनि यावे वहिले वेगावत ॥१६॥
ते म्हणती स्वामीया संताचें लक्षण । काय कैसी खूण सांगा आम्हां ॥१७॥
वर वेषा आम्ही पाहावे तें काय । अंतरीचें नव्हे विद्यमान ॥१८॥
गृहस्थाश्रमीं एक उदास दिसती । एक ते भासती व्यवसायीसे ॥१९॥
एक वेडे मुके पंगू मुद्राहीन । चतुर व्युत्पन्न दिसती एक ॥२०॥
देहाच्या संबंधें दिसे देहाकृती । अवस्थाही भोगिती यथाकाळें ॥२१॥
निद्रित निजेमाजी जागोचि जागृतीं । स्वप्नींही देखती नानाविध ॥२२॥
इंद्रियां वर्तविती स्वभावव्यापारीं । दिसती संसारी अतिदक्ष ॥२३॥
बाळक कौमार वृद्धाप्य तारुण्य । दिसती लौकिकासारखेची ॥२४॥
न चोजवे आम्हां संतांची निज खूण । सांगावें लक्षण तेंचि पाहूं ॥२५॥
आंगे संत तोचि ओळखे संतासी । काय आणिकासी वर्म कळे ॥२६॥
म्हणती चांगदेव साच हे बोलिले । विचार न चले युक्ती तेथें ॥२७॥
काय रे करावें पुसती शिष्यांसी । ते म्हणती सिद्धासी द्यावे पत्र ॥२८॥
लिहोनि पत्रिका द्यावी यांचे हातीं । देऊनि हे पाहती स्थित्यंतर ॥२९॥
पत्राचें उत्तर काय देती कैसें । अर्थी अनायासें येईल कळों ॥३०॥
मग पत्र लिहावया बैसले एकांती । न चलेची युक्ती थोटावली ॥३१॥
अनामासी नाम अरूपाशी रूप । कैसें लावूं पाप कल्पनेचें ॥३२॥
चिरंजीव म्हणों तरी विश्वात्मक । तीर्थरूप तरी बाळकदशा अंगी ॥३३॥
न दिसे पूर्वी न लभेचि अक्षर । पडियेला विचार न चले हात ॥३४॥
मग दिधली टाकुनी पत्रिका लेखणी । चित्तीं चिंतवणी पैठी झाली ॥३५॥
देखोनि सकळ प्रार्थिती सिद्धासी । कां हे दशा अशी विपरीत ॥३६॥
म्हणती चांगदेव काय रे लिहावें । मूळ न संभवे पत्रिकेचें ॥३७॥
तरी ते म्हणती देवा कोरें पत्र पुरे । द्यावें अत्यादरें पाठवुनी ॥३८॥
युक्तीमाजी दिसे बरवा हा सिद्धांत । सिद्धाईचा अर्थ गूढ गुह्य ॥३९॥
घालुनियां घडी कोरें पत्र देती । आणि उत्तर म्हणती मागा त्यांसी ॥४०॥
जाऊनियां तुम्हीं यावे शीघ्रवंत । करा दंडवत क्षेम सांगा ॥४१॥
चालिले तेथुनी आले शिवपीठा । वास्तव्य वरिष्ठा सिद्धा जेथें ॥४२॥
यावरि म्हणे निळा पत्राचें उत्तर । देती ज्ञानेश्वर परिसावे तें ॥४३॥
अत्यंत रसाळ आहे निरूपण । पुढील प्रकरण कसोटीचें ॥४४॥
॥ इति श्रीचांगदेवचरित्रे पत्रप्रेषणं नाम तृतीय प्रकरणं समाप्तम् ॥