नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा । निवृत्ती उदारा सोपान देवा ॥१॥
नमो मुक्ताबाई त्रैलोक्य पावनी । आदित्रय जननी देवाचिया ॥२॥
जगदुद्धारालागी केला अवतार । मिरविला बडिवार सिद्धाईचा ॥३॥
निळा शरणागत म्हणवी आपुला । संतीं मिरविला देऊनि हातीं ॥४॥