अखंड भूतदया मानसीं । वाचे नाम अहर्निशी । तया न बिसबे हृषिकेशी । मागें मागें हिंडतसे ॥१॥
जिहीं परकारणीं वेंचिलें । शरीर आयुष्य आपुलें । धन वित्तही वंचिले । तयां विठ्ठलें सन्मानिजे ॥२॥
जिहीं गाईलें नित्य नाम । अंतरीं धरुनियां प्रेम । तया वस्तिसी निजधाम । निर्मूनियां ठेविलें ॥३॥
जिहीं धरिला संतसंग । दुराविलें त्रिविध जग । तया सखा पांडुरंग । निजानुभवें जोडला ॥४॥
निळा म्हणे सद्गुरु भक्ति । दास्य ब्राम्हणांचे अनुरक्ती । तयालागीं हा श्रीपती । करी सांगाती आपुला ॥५॥