उठाउठा प्रभात जाहली । चिंता श्रीविठ्ठ्ल माउली । दीन जनांची साउली । येई धांउनी स्मरतांचि ॥१॥
पंढरपुरीं जे भिमाtटीं । सुंदर मनोहर गोमटी । दोन्ही कर ठेविनियां कटीं । भेटीसाठीं तिष्ठतसे ॥२॥
कीरीट कुंडलें मंडित । श्रीमुख अति सुंदर शोभत । गळां बैजयंती डुल्लत । हार मिरवत तुळसीचा ॥३॥
सुरेख मूर्ति सगुण सांवळी । कंठीं कौस्तुभ एकावळी । केशर उटी परिमळ आगळी । बुका भाळीं विलसतसे ॥४॥
पीत पीतांबर कसला कटीं । अक्षयीं वीट चरण तळवटी । सकळ सौंदर्य सुखाची पेटी । इंद्रिय संपुष्टी आठवातें ॥५॥
अति प्रिय आवडे तुळसी बुका । तसीच प्रीति करी भोळ्या भाविका । नामा पदपंकज पादुका । शिरीं मस्तकीं वंदीतसे ॥६॥