एके दिनीं प्रातः काळीं । कृष्णें घेतलीसे आळी । देखोनियां उदय मेळीं । सुर्यबिंब ॥१॥
देई देई मज तें आई । रडत बैसला हो बाई । काय सांगो हो सई । या बाळातें ॥२॥
मांडिलें विंदान । न कळे कोना महिमान । रडतां राहिना पुर्ण । तों देखे राधिका ॥३॥
राधा म्हणे कृष्णांसी । का रे चोरा रडतोसी । yeरु म्हणे गोळा दे मजसी । मग मी न रडे ॥४॥
उचलोनी काखेसी घेतला । तंव तो रडतां राहिला । यशोदा म्हणे राधिकेला । नेई घरा कृष्णतें ॥५॥
घेऊनियां झडकरीं । घरी आली सत्वरीं । सुमनांचे सेजेवरी । पहुडविलें कृष्णा ॥६॥
घरी देखोनी एकांत । चुबन देउनि बोले माते । अससी धाकुटी बहुत । नचले कांहीं ॥७॥
तंव बोले वनमाळी । थोर होतो हेचि वेळी । डोळें झांकीं तूं वेल्हांळीं दावी विंदान ॥८॥
नेत्र झाकितां तें क्षणीं । जाहला निमासुर तरुणी । षोडश वर्षी मोक्षदानी । देखे राधिका ॥९॥
धांउनी घातालीसे मिठी । हरुष न समाye पोटीं । शयन सुखें गोष्टीं । करी कृष्णांसी ॥१०॥
असतां सुखें एकांतासी । भ्रतार आला ते समयासी । उभा राहुनि द्वारासी । हांक मारी ॥११॥
ऐकतां भ्रतारांचें वचन । घाबरलें राधिकेचें मन । धरी कृष्नाचे चरण । सान होई ॥१२॥
कृष्ण बोले हास्यमुखे । मंत्र विसरलों या सुखें । आतां होणार तें सुखें । होवो यावरी ॥१३॥
भक्तांचे मानसींचा चोर । पाहूनियां तो विचार । पुर्ववत साचार होऊनि रडे ॥१४॥
दहीं भात कालवुनी । ठेविला पुढें आणुनी । बोले आनयासी प्रती वचनीं । क्षणभरी बैसा ॥१५॥
जेवितसे कृष्णनाथ । क्षणभरी बैसा स्वस्थ । ऐकतांचि ऐशीअ मात । निवांत बैसे ॥१६॥
मग द्वार उघडिविलें । राया कृष्णातें देखिलें । मन तें मोहिलें । अनायांचें ॥१७॥
आनया बोले राधिकेसी । गृहीं नगमें तुजसी । क्षणभरी कृष्णासी । आणीत जाई ॥१८॥
तुमची आज्ञा प्रणाम । म्हणोनि वंदिले चरण । एका जनार्दनी समाधान । पावले दोघे ॥१९॥