सत्यगुरुराये कृपा मज केली । परी नाहीं घडली सेवा कांहीं ।। १ ।।
सांपडविलें वाटे जातां गंगास्नाना । मस्तकीं तो जाणा ठेविला कर ।। ध्रु ।।
भोजना मागती तूप पावशेर । पडिला विसर स्वप्नामाजी ।। २ ।।
कांहीं कळे उपजला अंतराय । म्हणोनियां काय त्वरा जाली ।। ३ ।।
राघव चैतन्य केशव चैतन्य । सांगितली खुण माळिकेची ।। ४ ।।
बाबाजी आपुलें सांगितलें नाम । मंत्र दिला राम कृष्ण हरि ।। ५ ।।
माघशुद्ध दशमी पाहुनि गुरुवार । केला अंगीकार तुका म्हणे ।। ६ ।।