तीर्थ विठ्ठल । क्षेत्र विठ्ठल ।
देव विठ्ठल । देवपूजा विठ्ठल ॥१॥
माता विठ्ठल । पिता विठ्ठल ।
बंधु विठ्ठल । गोत्र विठ्ठल ॥२॥
गुरू विठ्ठल । गुरुदेवता विठ्ठल ।
निधान विठ्ठल । निरंतर विठ्ठल ॥३॥
नामा म्हणे मज विठ्ठल सापडला ।
म्हणुनी कळिकाळा पाड नाही ॥४॥
देव विठ्ठल । देवपूजा विठ्ठल ॥१॥
माता विठ्ठल । पिता विठ्ठल ।
बंधु विठ्ठल । गोत्र विठ्ठल ॥२॥
गुरू विठ्ठल । गुरुदेवता विठ्ठल ।
निधान विठ्ठल । निरंतर विठ्ठल ॥३॥
नामा म्हणे मज विठ्ठल सापडला ।
म्हणुनी कळिकाळा पाड नाही ॥४॥